शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बस-टँकरचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:22 IST

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर ढोलबारे गावानजीक (ता.बागलाण) रविवारी (दि. १५) भरधाव शिवशाही बस व गॅस टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देतीन जणांची प्रकृती गंभीर विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील ढोलबारे गावानजीक घटना

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर ढोलबारे गावानजीक (ता.बागलाण) रविवारी (दि. १५) भरधाव शिवशाही बस व गॅस टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अधिक उपचारासाठी मालेगावयेथे पाठविण्यात आले आहे.यात दांपत्यासह लहानमुलीचा समावेश आहे. गत पंधरा दिवसांच्या कालावधीत वीरगाव परिसरात घडलेला हा दुसरा अपघात आहे.नाशिक येथून नंदुरबारकडे जात असलेली शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०७६९) व ताहाराबादकडून सटाण्याकडे येत असलेला गॅस टँकर यांच्यात ढोलबारे या गावानजीक शाहू पॅलेस हॉटेल परिसरात रविवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली.धडक इतकी जोरात बसली की दोन्ही वाहने अपघातानंतर रस्त्यावर उलटली. या अपघातात शिवशाही बस व टॅँकरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. यात बस व टँकर चालकासह बसमधील १५ ते २२ प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले, तर किरकोळ जखमींवर सटाणा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात असून, गत पंधरा दिवसांच्या कालावधीत परिसरात घडलेला हा दुसरा अपघात आहे. शिवशाही बसमधील प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास करण्यात येत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला गॅस टँकर अपघातानंतर रस्त्याच्या बाजूस उलटल्याने गॅस गळती होण्याची भीती व्यक्त केली जात होती.तालुका प्रशासनाने तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन आवश्यक त्या गोष्टींची खातरजमा केली. टँकरमधून कोणत्याही प्रकारची गॅस गळती होत नसल्याची खात्री झाल्यानंतर विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.बसमधून प्रवास करणे झाले धोक्याचेपरिवहन महामंडळाने प्रवासी वर्गासाठी सर्व सोयीसुविधांयुक्त शिवशाही बस उपलब्ध करून दिल्याने खासगी वाहतुकीकडे आकर्षित झालेला प्रवासी वर्ग शिवशाही बसकडे ओढला गेला आहे; मात्र बसचालकांच्या चुकांमुळे सद्यस्थितीत या बसचे राज्यभर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, अनेक ठिकाणी त्या साक्षात मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे या बसमधून प्रवास करणे धोक्याचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.अपघातातील गंभीर जखमींची नावेभालचंद्र काळू शिरोडेकुसुम भालचंद्र शिरोडेअन्य एक मुलीचा यातसमावेश असून, नाव समजूशकले नाही.

टॅग्स :Accidentअपघात