शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शिवसेना विरुद्ध आयुक्त ‘सामना’

By admin | Updated: January 7, 2016 23:46 IST

‘कपाट’ प्रकरण : मनपा आयुक्तांच्या हटवादी भूमिकेला सेना देणार प्रत्युत्तर

नाशिक : इमारत बांधकामातील ‘कपाट’प्रकरणी शिवसेनेच्या मुखपत्रात महापालिका आयुक्तांवर झालेली टीका आणि त्यानंतर आयुक्तांनी ट्विटरवर नोंदवलेली जळजळीत प्रतिक्रिया यामुळे शिवसेना विरुद्ध आयुक्त यांच्यात आता ‘सामना’ सुरू झाला असून, आयुक्तांनी आपला हटवादीपणा न सोडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. सेनेच्या या पवित्र्यामुळे ‘कपाट’ प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीत ‘कपाट’च्या माध्यमातून सुमारे एक ते दीड टक्के वाढीव बांधकामाची प्रथा नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून दंडात्मक कारवाई करून सदर ‘कपाट’ नियमित करण्याची प्रथा होती. परंतु, सदर प्रथा बेकायदेशीर ठरवत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यास परवानगी नाकारली आहे. सदरचा विषय राज्य शासनाकडेही प्रलंबित आहे. ‘कपाट’ प्रकरणामुळे सुमारे २५०० बांधकामांच्या परवानग्या रखडल्या आहेत. सदर ‘कपाट’ प्रकरणी शिवसेनेच्या मुखपत्रात आयुक्तांच्या भूमिकेविरुद्ध टीका करणारे भाष्य प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी त्यावर ट्विट करत वादाला आणखी तोंड फोडले. ट्विटरवर आयुक्तांनी जळजळीत प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांवर टीकास्त्र सोडले.