शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; विजय करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:09 IST

Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे.

Nashik Lok Sabha ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी अखेर आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उद्धव ठाकरे यांनी १७ उमेदवारांची घोषणा केली असून काही ठिकाणी त्यांच्याकडून धक्कातंत्राचा अवलंबही करण्यात आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजय करंजकर यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरेंनी या जागेवर राजाभाऊ वाजे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागील दोन आठवड्यांपासून नाशिकच्या उमेदवारीसाठी अचानक राजाभाऊ वाजेंचे नाव चर्चेत आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर नाशिकमधून वाजे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

नाशिकमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ साली ते सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. राजाभाऊ वाजेंना मोठा राजकीय वारसाही लाभला आहे. त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते . त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून १९६७ साली निवडून आल्या होत्या. तसंच राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील २००९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती .

शिवसेनेत २०२२ साली झालेल्या फुटीनंतर नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र या फुटीनंतरही राजभाऊ वाजे हे मात्र ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. आता लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊन उद्धव ठाकरे यांनी वाजे यांना निष्ठेचं बक्षीस दिल्याचं बोललं जात आहे.

विजय करंजकरांच्या नावाची होती जोरदार चर्चा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून रंगत होती. त्या अनुषंगाने मतदारसंघ पिंजून काढत करंजकर यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. विशेष म्हणजे कालच विजय करंजकर यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. "विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या स्टेटसच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. लोकसभा तुलाच लढवायची आहे, असा आदेश मला उद्धव साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे मी लढणारच आणि नाशिक जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने जिंकणार सुद्धा," असा विश्वास विजय करंजकरांनी व्यक्त केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड  होणार आहे.

दरम्यान, विजय करंजकर यांच्या जनाधाराबाबत पक्षनेतृत्व साशंक असल्याने ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. तिकीट कापल्याने विजय करंजकर या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :nashik-pcनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाHemant Godseहेमंत गोडसेRajabhau Wajeराजाभाऊ वाजे