शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

शिवसेना तालुकाप्रमुखाचा गौणखनिज घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:21 IST

नाशिक : पेठ तालुका शिवसेना प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य भास्कर गोपाळ गावित यांनी शासनाचा ३०० कोटींचा महसूल बुडवून घोटाळा केल्याचा आरोप माकपचे जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठ तालुका शिवसेना प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य भास्कर गोपाळ गावित यांनी सरकारी जमिनीवर कोणतीही गौणखनिज उत्खननाची परवानगी न घेता २००६ पासून आजपर्यंत केलेल्या गौणखनिज उत्पन्नातून शासनाचा ३०० कोटींचा महसूल बुडवून घोटाळा केल्याचा आरोप माकपचे जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत केला. पेठ येथील ग्रामपंचायत मालकीच्या गायरान जमीन गट क्रमांक २२३, २२४ व २३५ या गटक्रमांकामध्ये खडीक्रशर व डांबर प्लांट टाकून सन २००६ पासून सरकारी जमीन गट क्रमांक २२३ व २२४ वर गौणखनिजाची खदाण व डांबर प्लांट टाकून उत्खनन सुरू केले. यासाठी कोणतीही सरकारी परवानगी न घेताच हे वर्षानुवर्ष उत्खनन करून सरकारचा गौणखनिजाचा सुमारे ३०० कोटींहून अधिक रकमेचा महसूल बुडविल्याचा आरोप सुनील मालुसरे, अ‍ॅड. दत्तू पाडवी, नामदेव मोहनकर यांनी केला. या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार भागवत डोईफोडे, सोनवणे, कडलग तसेच विद्यमान तहसीलदार हरिष भांबरे यांच्या कार्यकाळात हा कोट्यवधी रुपयांचा घोेटाळा झाला आहे. संबंधित व्यक्तीला राजकीय दबावापोटी ५१ लाखांंच्या दंडाची कारवाई केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे आपण पाठपुरावा करीत असल्याचे माकपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भास्कर गावित यांचा पेठ शहरात तीन कोटींहून अधिक रकमेचा बंगला आहे. शिवाय पेठ शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला लागून असलेल्या स्टोन क्रशरमुळे धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. तक्रारीनंतर तहसीलदारांनी स्टोन क्रशरवर कारवाई करीत विद्युत जोडणी खंडित केली आहे. स्थानिक अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करणारा अहवाल पाठवून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई न केल्यास विधानसभा व लोकसभेत याविरोधात आवाज उठविण्यात येणार असल्याचे सुनील मालुसरे व अ‍ॅड. दत्तू पाडवी यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर गावित, गायकवाड आदी उपस्थित होते.