पंचवटी : पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ५१ लीटर दुधाचा दुग्धाभिषेक आणि महाआरती करून राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून सकाळी मंत्रोच्चार करीत दुग्धाभिषेक, जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मामासाहेब राजवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याने परिसर दुमदुमला होता. यावेळी राजवाडे यांनी आजच्या युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत, समाजकारण करावे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उल्हास धनवटे, नरेश पाटील, सागर बैरागी, विशाल देशमुख, किरण पानकर, शाहू पवार, मनोज जाधव, विलास जाधव, राम तांबे, अनिल अलई, सतीश काळे, योगेश पवार, प्रकाश गवळी, प्रशांत सोनवणे, गंगाराम बोधले, प्रथमेश येवले, योगेश परदेशी आदींसह मंडळाचे कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते.