शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शिवभोजन थाळीचे काम महिला बचत गटांना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:58 IST

दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल

ठळक मुद्देछगन भुजबळ : विभागीय महिला बचत गटांचे प्रदर्शनकलाग्राममध्ये १०० स्टॉल्स असून हॉल, प्रशिक्षण हॉल, वीज, पाणी सुविधा उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आघाडी शासनाने गरीब कुटुंबांसाठी २६ जानेवारीपासून शिवभोजन थाळी सुरू केली असून, या थाळीसाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याद्वारे गरिबांना अन्न तर बचत गटांना उत्पन्न मिळण्यास मदत होणार असून, मार्चपासून दररोज १ लाख कुटुंबांना शिवभोजन थाळीद्वारे पोटभर अन्न देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक विभाग यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सव आणि स्वयंसहाय्यता समूहातील महिला सदस्यांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले, दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल. कलाग्राममध्ये १०० स्टॉल्स असून हॉल, प्रशिक्षण हॉल, वीज, पाणी सुविधा उपलब्ध आहे. महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी हे स्टॉल्स कायमस्वरूपी बचत गटांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. महिला बचत गट चळवळ ही ग्रामीण भागातील महिलांची शक्ती असून, त्याद्वारे महिला संघटित होऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरण आणि स्वावलंबनासाठी महिला बचत गटांचा मेळावा महत्त्वपूर्ण असून, महिलांना ऊर्जा देणारा आहे. महिलांनी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाचा आदर्श घेऊन कोणत्याही परिस्थितीला न घाबरता वाटचाल करावी, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी आमदार सरोज अहिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागीय उपायुक्त प्रतिभा संगमनेरे यांनी केले, तर इशाधिन शेळकंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदChagan Bhujbalछगन भुजबळ