शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादीचे बाळासाहेब सानप यांनी बांधले शिवबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 01:00 IST

राष्टवादीकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीनंतर अवघ्या दहा दिवसांतच राष्टवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले आहे.

नाशिक : राष्टवादीकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीनंतर अवघ्या दहा दिवसांतच राष्टवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले आहे. रविवारी सकाळी सानप खासदार संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर पोहचले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या सेना प्रवेशामागे नेमके काय दडलंय याचीच चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.रविवारी सकाळी सानप यांनी मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. त्यांच्या या निर्णयाची त्यांनी राष्टवादीच्या कुणालाही कल्पना दिली नव्हती शिवाय अगदी निवडक कार्यकर्त्यांस सानप रविवारी सकाळी राऊत यांच्याकडे पोहचले आणि तेथून त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पूर्व मतदारसंघात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना उमेदवारी मिळावी यासाठी सानप समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, याउलट मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी देऊन भाजपने सानप यांचा पत्ता कट केला. त्यामुळे नाराज सानप यांनी अखेरच्या क्षणी राष्टवादीत प्रवेश करून पूर्व मतदारसंघातून भाजपविरोधात दंड थोपटले. या मतदारसंघात भाजपविरु द्ध राष्टवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत झाली. भाजपचे ढिकले यांनी सानप यांच्यावर मात केली.भाजपने तिकीट कापल्यानंतर राष्टवादीचे घड्याळ बांधून भाजपविरोधात निवडणूक लढविणाऱ्या सानप यांनी पराभूत होताच ‘घड्याळ’ उतरवून मनगटावर शिवबंधन बांधून घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.राष्टवादीत मोठ्या जबाबदारीचे होते संकेतनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर सानप हे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर पक्ष मोठी जबाबदार सोपविणार असल्याचेदेखील जाहीर केले होते. राष्टवादीकडून नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार याविषयीचे अंदाज बांधले जात होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBalasaheb Sanapबाळासाहेब सानपShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक