शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नाशकात शिवजयंतीला हर्षाेल्हासात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:15 AM

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण रात्री शहरातील मेनरोड येथून मशाल रॅली काढण्यात आली

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे शहर अध्यक्ष सुनील बागुल, आमदार अपूर्व हिरे, संजय चव्हाण, मुकेश शहाणे, वत्सला खैरे, अजय बागुल, सचिन मोरे, हंसराज वडघुले, दिनेश चव्हाण आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. दरम्यान, रात्री शहरातील मेनरोड येथून मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत नितीन रोटे-पाटील, हिरामण वाघ, भूषण काळे, अमोल पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातून रात्री मशाल रॅली

शिवजयंती उत्सव : शिवरायांना अभिवादन

नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रात्री ११.३० वाजता मेनरोड येथील गाडगे महाराज पुतळा येथून मशाल रॅली काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी करीत मेनरोड येथून मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष करीत मशाल रॅली काढण्यात आली. भगवे फेटे परिधान करून रॅलीत कार्यकर्ते सहभागी झाले होते.रविवारी रात्री ११.३० वाजता निघालेली मिरवणूक मेनरोडमार्गे, महात्मा गांधीरोडने रॅली जिल्हा न्यायालयासमोरील शिवाजी पुतळा येथे काढण्यात आली. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान, शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता शहरातील अनेक भागांतून कार्यकर्ते दाखल झाले होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. येथील पुतळ्यास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.