सिन्नर : वडांगळी येथील विद्युत उपकेंद्रावर जुन्या कोमलवाडी फिडरवर एसडीटी रोहित्र बसण्याचे काम सुरू होते. सोमवारी हे काम पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करून शेत शिवारात सिंगल फेज कार्यान्वित करण्यात आली. यामुळे शेतशिवार प्रकाशमान झाला आहे.
अनेक वर्षांपासून शिवारात वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांना अक्षय प्रकाश योजनेच्या थेट लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र काही नवीन नाही. थ्री फेज गेल्यानंतर संध्याकाळच्या प्रकाशासाठी जीव धोक्यात टाकत रोहित्रावर बांबूच्या साहाय्याने अनेक शेतकरी एक फेज अर्थ करून आपले घर प्रकाशित करत. यामध्ये अनेकदा विजेचा धक्का बसून अनेकांनी प्राण गमावले तर अनेक गंभीर जखमी झाल्याचेदेखील बघावयास मिळालेले आहे. या सर्व बाबींवर वडांगळी शिवारातील अंधकार दूर करण्यासाठी उपकेंद्रावर एसडीटी रोहित्र बसविण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सरपंच योगेश घोटेकर यांनी केली होती. त्यावर आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांच्याशी संवाद साधत प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले होते.
मेंढी फिडरवर गावठाण असल्याने ते रोहित्र तेथे कार्यान्वित करता येणार नसून तांत्रिक दृष्ट्या जुना कोमलवाडी फिडर एसडीटी करू शकतो ही माहिती कोकाटे यांना दिली. ठेकेदाराकडून तत्काळ तो स्थलांतरित करून कार्यान्वित करण्याच्या सूचना कोकाटे यांनी खैरनार यांना केल्या. त्यांनतर पंधरा दिवसांत रोहित्र कोकाटे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष सुदेश खुळे, खंडेराव खुळे, विक्रम खुळे, विलास खुळे, अशोक खुळे, अमित भावसार, नानासाहेब खुळे, सरपंच योगेश घोटेकर, राहुल खुळे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव पवार व कर्मचारी वृंद उपस्थित होते. वर्षानुवर्ष रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
------------------
वडांगळी परिसरात सिंगल फेज योजना कार्यन्वित करताना जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे. समवेत योगेश घोटेकर, ऋषिकेश खैरनार, सुदेश खुळे, नानासाहेब खुळे व शेतकरी. (१३ सिन्नर २)
===Photopath===
130421\13nsk_4_13042021_13.jpg
===Caption===
१३ सिन्नर २