शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सवाचा निधी  शहीद जवानांच्या कुटुंबीयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:47 IST

पुलवामा घटनेमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याने शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा करून जमा झालेला निधी सदर जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय सिडको जन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला होता.

सिडको : पुलवामा घटनेमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याने शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा करून जमा झालेला निधी सदर जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय सिडको जन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला होता. बुधवारी (दि.२७) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.पुलवामा घटनेमध्ये जे भारतीय जवान शहीद झाले त्यांच्याप्रति सिडको शिवजयंती समितीच्या वतीने शिवजयंती साधेपणाने साजरी करून मिरवणुकीवरील खर्च हा शहीद जवानांच्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत जमा झालेला एक लाख रुपयांचा निधी जमा केला. सदरचा निधी शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना नितीन राठोड तसेच शहीद जवान संजय राजपूत यांच्या वीरपत्नी सुषमाबाई संजय राजपूत यांना देण्यात येणार आहे़ या उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.यावेळी वैभव देवरे, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे, आशिष हिरे, विजय पाटील, योगेश जाधव, योगेश गांगुर्डे, प्रसाद पाटोळे, रोहित उघडे, निखिल पवार, अजय गोसावी आदी उपस्थित होते.  सिडको परिसरात मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील शिवजन्मोत्सव १८ पगड जाती सोबत घेऊन जल्लोेषात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पुलवामा घटनेत ४०हून अधिक जवान शहीद झाल्याने शिवरायांची शिकवण लक्षात घेत कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता यावर्षी साधेपणाने शिवजन्मोत्सव साजरा करणे हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवजयंती साधेपणाने साजरी करून जमा झालेला निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSeema Hariसीमा हिरे