शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर शिवाजी चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी; जामिनावर सोमवारी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 20:55 IST

दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार युक्तीवादामुळे अडीच तास सुनावणी चालली. सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटाला न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे न्यायालयात शनिवारी (दि.१७) पथकाने संशयित चुंभळे यांना हजर केले. पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस कोठडीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांना ३ लाख रूपयांची लाचेच्ी रक्कम तक्रारदाराकडून स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि.१७) पथकाने संशयित चुंभळे यांना हजर केले. जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-१ व्ही.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात पोलीस कोठडी व जामीन मिळविण्यासाठी सुमारे अडीच तास दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद चालला. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेत चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच जामीन अर्जावरील सुनावणी येत्या सोमवारी (दि.१९) होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस कोठडीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.बाजार समितीच्या एका विद्यमान संचालकाच्या भाच्यास ई-नाम योजनेअंतर्गत समितीमध्ये सहा महिन्यांसाठी कंत्राटी पध्दतीने नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याकरिता चुंभळे यांनी सुमारे १० लाखांची लाच मागितल्याची बाब तपासात पुढे आली. तडजोडअंती सहा लाख रूपयांची रक्कम ठरविली गेली. त्या लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता तीन लाख रूपये स्विकारताना चुंभळे यांना बागायतदारांच्या वेशात सापळा रचलेल्या पथकाने रंगेहाथ अटक केली.शनिवारी दुपारी चार वाजता न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करत संशयित आरोपीच्या आवाजाचे नमुने, विविध बॅँकांमध्ये एकापेक्षा अधिक असलेली बॅँक खाती, लॉकर्सची पडताळणी तसेच फार्महाऊसवर तपासी पथकाला आढळून आलेले किमान ७०पेक्षा अधिक वेगवेगळ्या जमिनींची सातबारासारखी कागदपत्रे, ८ ते १० खरेदीखत यांची पडताळणीकरिता पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. संशयिताच्या वकिलांनी बचाव करत गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांच्या पक्षकाराच्या व्याधी, वय सांगून पोलीस कोठडीची गरज नसल्याने सरकारी पक्षाची मागणी रद्द करण्याचा युक्तीवाद चुंभळे यांच्याकडून अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी केला. तसेच जामीन मिळविण्यासाठी अर्ज न्यायालयात सादर केला. यावेळी मिसर यांनी त्यावर हरकत घेत जामीन अर्ज अगोदर नोंदविण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत जामीन अर्ज नोंदणी होऊन न्यायालयापुढे मांडला गेला. दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार युक्तीवादामुळे अडीच तास सुनावणी चालली. सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटाला न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागNashikनाशिकArrestअटकShiv Senaशिवसेना