शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:54 IST

नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांना चांगलीच भोवली असून, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालक पदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभापतिपदही आपसूकच गेले आहे.

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांना चांगलीच भोवली असून, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालक पदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभापतिपदही आपसूकच गेले आहे. सहकार खात्याच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या सभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे.गेल्या महिन्यात बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाºयास कायम करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंभळे हे बाजार समितीचे सभापती असल्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणातील पुरावे (पान ५ वर)नष्ट करण्याचा तसेच बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन चुंभळे यांना बाजार समितीच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीला पत्र देऊन चुंभळे यांना बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक कामकाजात सहभागी न करून घेण्याच्या सूचना बाजार समिती सचिवांना देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा उपनिबंधकांच्या या पत्राला चुंभळे यांनी आव्हान देऊन बाजार समितीच्या कामकाजात सहभागी झाले होते. या संदर्भात उपनिबंधकांकडे अपिलावर सुनावणी घेण्यात आली. त्यात चुंभळे यांच्या वतीने युक्तिवाद करून ते लोकसेवक व्याख्येत बसत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. शुक्रवारी या संदर्भातील सुनावणी होऊन उपनिबंधकांनी निर्णय राखून ठेवला होता. त्याचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आला. त्यात बाजार समितीचा सदस्य या नात्याने चुंभळे यांनी पदाचा दुरुपयोग केला असून, त्यामुळे त्यांना बाजार समितीच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाजार समितीचे सात सदस्य यापूर्वीच चुंभळे यांच्या विरोधात गेले असून, आता त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आल्याने सभापतिपदही आपोआपच गेले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सभापतिपदासाठी लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, त्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNashikनाशिक