शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:25 IST

परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रस्ते भगवेमय होत आहेत. ओझर, सुकेणे, पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठांमध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मूर्ती, भगवे झेंडे दाखल झाल्याने शिवप्रेमींची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

कसबे सुकेणे : परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रस्ते भगवेमय होत आहेत. ओझर, सुकेणे, पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठांमध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मूर्ती, भगवे झेंडे दाखल झाल्याने शिवप्रेमींची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.  सोमवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सुकेणे परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कसबे सुकेणे येथील विविध सामाजिक मंडळे, संस्था, केआरटी विद्यालय, शाळा यांच्या वतीने जयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.  येथील दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून कसबे सुकेणे येथे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविला जातो. यंदा ‘धुळीपासून सुकेणेकरांचे संरक्षण आणि उपाय-योजना’ या विषयी कार्यक्रम होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, कोकणगाव, पिंपळस (रामाचे), भाऊसाहेबनगर, शिरसगाव या भागातही शिव जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येक रस्ते, चौक पताका, झेंड्यांनी सजू लागले आहेत. ओझर, कसबे सुकेणे, पिंपळगाव येथील बाजारपेठा शिवमय ओझर, कसबे सुकेणे, पिंपळगाव येथील बाजारपेठा आणि मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी शिवाजी महाराज यांच्या मूर्ती, भगवे झेंडे, प्रतिमा विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील शिवप्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. आडगाव, ओझर परिसरात राजस्थानमधील कारागीर दाखल झाले असून, शिवाजी महाराज यांच्या विविध मुद्रेतील आकर्षक पुतळे त्यांनी बनवले आहेत. उंचीनुसार सरासरी दोनशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे पुतळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे कारागीर दोन महिन्यांपासून रात्रंदिवस मूर्ती तयार करत आहेत, अशी माहिती राजस्थानहून आलेले मोतीलाल मूर्तीवाले यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक