शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रूग्णालयांवर कारवाईसाठी शिवसेनेचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:24 IST

नाशिक- शहरातील काही खासगी रूग्णालयांकडून काेरोना बाधीतांवर उपचा करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रूग्णालयात नियुक्त केलेले लेखा परीक्षक आणि नोडल ऑफीसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रूग्णांची पिळवणूक करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करावी असा अल्टीमेटम शिवसेनेने दिला प्रशासनाला दिला आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षाने दिला आहे.

ठळक मुद्दे भरमसाठ बिल वसुलीची तक्रार महापालकेचे नियंत्रण नसल्याची तक्रार

नाशिक- शहरातील काही खासगी रूग्णालयांकडून काेरोना बाधीतांवर उपचा करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रूग्णालयात नियुक्त केलेले लेखा परीक्षक आणि नोडल ऑफीसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रूग्णांची पिळवणूक करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करावी असा अल्टीमेटम शिवसेनेने दिला प्रशासनाला दिला आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षाने दिला आहे.

विराेधी पक्ष नेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बुधवारी (दि.२६) प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यात महापालिकेचे लेखा परीक्षक खासगी रूग्णालयांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर शहरात अनेक रुग्णांलयांना कोविड रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वीही या रूग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी खासगी रूग्णालयांच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. महापालिकेने त्यानुसार कार्यवाही केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा भरमसाठ बिलांची वसुलीचे प्रकार सुरू झाले आहेत.  यासंदर्भात नागरीक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घेत आहेत.  दुसऱ्या लाटेत एकेका घरात चार ते सहा रूग्ण बाधीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मिळकती मोडून बिल भरण्याची वेळ आली आहे. अनेकांनी व्याजाने देखील पैसे घेतले आहेत. मात्र अशा रूग्णांकडून भरमसाठ रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयाकडील देयकांची मनपाचे लेखापरीक्षक, नोडल ऑफीसर यांचेमार्फत तात्काळ तपासणी करून रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा अशी मागणीही बोरस्ते आणि शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेनाhospitalहॉस्पिटल