शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा विरोध : ‘ईईएसएल’कडून एलईडीची खरेदी पालिकेला ठगणार अंधार पसरविण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:19 IST

नाशिक : एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ई.ई.एस.एल) सोबत एलईडी दिव्यांची खरेदी करण्याचा दबाव राज्य सरकारकडून महापालिकेवर टाकला जात आहे.

ठळक मुद्दे ‘दिवे’ प्रकाशाऐवजी अंधार पसरविणारेच नाशिककरांवर अंधाराचे साम्राज्य

नाशिक : एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ई.ई.एस.एल) सोबत एलईडी दिव्यांची खरेदी करण्याचा दबाव राज्य सरकारकडून महापालिकेवर टाकला जात आहे. महापालिकेवर या कंपनीचा करार लादण्याचा प्रयत्न सुरू असून, यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. कारण या कंपनीने अद्याप लावलेले ‘दिवे’ प्रकाशाऐवजी अंधार पसरविणारेच असल्याचे समोर आले. त्यामुळे नाशिककरांवर अंधाराचे साम्राज्य पसरविण्याचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यांमधील विविध शहरांसह मुंबई महापालिकेमध्येही या कंपनीच्या कारभाराचे ‘दिवे’ लागले आहेत. ई.ई.एस.एल.चा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे या कंपनीबाबतचा करार करून मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या जनतेची वाट ‘अंधकारमय’ करण्याचा प्रयत्न केल्याचे बोरस्ते म्हणाले. ऊर्जा बचतीसाठी ‘इस्को’सारखे प्रभावी मॉडेल असताना ई.ई.एस.एल.चा करार करून दरमहा ई.एम.आय. कंपनीला भरण्याचा भार मनपावर लादण्याचा अट्टाहास सरकारकडून कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ई.ई.एस.एल. कंपनीने लावलेले दिवे सुस्थितीतील असो किंवा नसो, त्यांचा प्रकाश जमिनीवर व्यवस्थित पडत आहे की नाही, या पडताळणीचाही अधिकार महापालिकेला नसणार आहे. एकू णच केंद्राची कंपनी म्हणून ई.ई.एस.एल.च्या कारभारावर महापालिकेचे कुठलेही नियंत्रण राहणार नाही. २०११ सालचा वादग्रस्त एलईडी दिवे खरेदी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पालिकेतील सत्तारूढ भाजपाने पुन्हा एकदा शहरातील संपूर्ण ८५ हजार पथदीपांसाठी एलईडी दिव्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ई.ईएस.एल. या शासननियुक्त कंपनीकडून एलईडी दिवे खरेदीचा घाट घातला गेला असून, महासभेत मंजुरीही मिळविली. त्यासाठी निविदा प्रक्रि येत असलेल्या ८५हजार एलईडी दिव्यांची खरेदीदेखील रोखण्यात आली आहे, असे बोरस्ते पत्रकार परिषदेत म्हणाले.ठेकेदारांना पोसण्यासाठी गोंडस ‘दिवे’ऊर्जा बचतीच्या गोंडस नावाखाली ठेकेदारांना पोसण्यासाठीच ईईएसएल एजन्सी महापालिकेच्या माथी मारली जात आहे. केंद्राच्याच स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ‘इस्को’ एलईडी दिवे बसविण्याची योजना यापूर्वीच मंजूर आहे. या अंतर्गत एलईडी दिवे बसविणाºया एजन्सीचे संयुक्त खाते तयार केले जाणार आहे. ऊर्जा बचतीतून होणाºया रकमेचा फायदा मनपालाही होणार आहे. ऊर्जा बचत न झाल्यास मनपाला कुठलाही तोटा सहन करावा लागणार नाही. ‘ईईएसएल’ला ठेका दिल्यास ऊर्जा बचत होवो अगर ना होवो संबंधित कंपनीला देयक अदा करण्याची सक्ती मनपाला असेल, यासाठी विशिष्ट रकमेचे हप्ते बांधून देण्यात येतील.