शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

शिवसेनेचा ‘धडक मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:47 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढत असलेली महागाई या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे त्यात कडक लक्ष्मीचे पारंपारिक लोककलावंत आसूड ओढून घेत सहभागी झाले होते.

ठळक मुद्देअच्छे दिनचे गाजर : भाजपावर टीका, बैलगाडीवर झाले नेते स्वार

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढत असलेली महागाई या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे त्यात कडक लक्ष्मीचे पारंपारिक लोककलावंत आसूड ओढून घेत सहभागी झाले होते.शिवसेनेच्या वतीने जिल्हाभर शुक्रवारी (दि. ५) मोर्चे काढण्यात आले होते. नाशिक शहरात शालिमार चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून निघालेला मोर्चा सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोदी सरकारच्या अच्छे दिन आणि गाजर दाखविण्याच्या संदर्भातील घोषणा तसेच शिवसेनेचा जयजयकार करत हा मोर्चा काढण्यात आला. विशेषत: बैलगाडी आणि कडक लक्ष्मीच्या लोककलावंतांचा सहभाग लक्षवेधी होता.यावेळी मोर्चेकऱ्यांतर्फे भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असलेल्या इंधनाच्या दरात रोज होत असलेली दरवाढ ही केंद्र शासन जाणीवपूर्वक करतेय की काय, असे नागरिकांना वाटत आहे. दुष्काळ व महामार्गावरील दारूबंदीचा सेस कमी केल्यास पेट्रोलचे दर आणखी पाच ते सात रुपयांनी स्वस्त होतील, असे निवेदनात म्हटले असून, पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी त्यांना जीएसटी लागू करावा अशी मागणी माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजरकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सचिन मराठे व महेश बडवे, माजी महापौर विनायक पांडे, मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनपातील गटनेता विलास शिंदे यांनी केली. या मोर्चात निवृत्ती जाधव, मंदा दातीर, श्यामला दीक्षित, दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, रवींद्र जाधव, दिलीप मोरे, सचिन बांडे, सुनील जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.महागाईच्या मोर्चात नोटांची उधळणशिवसेनेच्या वतीने महागाईच्या विरोधात जिल्हाभर मोर्चे काढण्यात आले असताना नाशिकमध्ये एका पदाधिकाºयाने नोटांची केलेली उधळण हा चर्चेचा विषय ठरला. मोर्चा लक्षवेधी ठरावा यासाठी शिवसेनेच्या मोर्चात अंगावर आसूड ओढून घेणारे कडक लक्ष्मीचे लोककलावंत सहभागी झाले होते. हे खरेच पारंपरिक व्यावसायिक असले तरी त्यामुळे मोर्चातील गांभीर्याला वेगळेच वळण लागले. विशेषत: महागाईच्या विरोधात मोर्चा असताना या कलावंतांवर चक्क नोटांची उधळण केली तसेच शारीरिक कसरती करून शंभर रुपयांची नोट उचलण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार काही नेत्यांच्या लक्षात येताच त्यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाºयाची खरडपट्टी काढली आणि हा महागाईच्या विरोधातील मोर्चा आहे इतके तरी भान ठेवा असे बजावले; परंतु तोपर्यंत नोटा उधळण्याचा प्रकार उपस्थित नागरिकांनीदेखील बघितला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन