गोवर्धन गटातून शिवसेनेचे चारोस्कर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:25 AM2019-12-14T01:25:39+5:302019-12-14T01:25:58+5:30

जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र अशोक चारोस्कर हे २३७ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी राष्टÑवादीचे उमेदवार प्रभाकर गुंबाडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पाचव्या फेरीपर्यंत राष्टÑवादीचे उमेदवार पाचशे मताधिक्क्याने आघाडीवर होते. मात्र सहाव्या फेरीने चारोस्करांना हात देत विजयाची माळा गळ्यात घातली.

Shiv Sena's Charoskar won from Govardhan group | गोवर्धन गटातून शिवसेनेचे चारोस्कर विजयी

गोवर्धन गटातून शिवसेनेचे चारोस्कर विजयी

Next
ठळक मुद्देराष्टÑवादीचा पराभव : भाजप चौथ्या क्रमांकावर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र अशोक चारोस्कर हे २३७ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी राष्टÑवादीचे उमेदवार प्रभाकर गुंबाडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पाचव्या फेरीपर्यंत राष्टÑवादीचे उमेदवार पाचशे मताधिक्क्याने आघाडीवर होते. मात्र सहाव्या फेरीने चारोस्करांना हात देत विजयाची माळा गळ्यात घातली.
गोवर्धन गटातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून निवडून आलेले हिरामण खोसकर यांनी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. राज्यात महाआघाडी अस्तित्वात आल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या वतीने एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो फोल ठरल्यामुळे राष्टÑवादीने प्रभाकर गुंबाडे यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेनेही राजेंद्र अशोक चारोस्कर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.
भाजपने दौलत ससाणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे सेनाविरुद्ध राष्टÑवादीविरुद्ध भाजप अशी लढत झाली. या गटासाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यात एकूण १३ हजार ४२२ मतदारांनी म्हणजेच ४३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची मोजणी शुक्रवारी सकाळी नाशिक तहसीलदार कार्यालयात करण्यात आली. त्यासाठी सहा टेबल लावण्यात आले होते.
चारोस्कर विजयी झाल्याचे घोषित करण्यात येत असतानाच, राष्ट्रवादीने मतमोजणीला आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली त्यावरून काही वेळ तणाव निर्माण झाला.
अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणीची मागणी मान्य करीत, पुन्हा मोजणीला सुरुवात केली. परंतु त्यातही निकाल कायम राहिल्याने शिवसेनेने जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत राजेंद्र चारोसकर यांना ४२९० मते मिळाली, तर राष्टÑवादीचे प्रभाकर गुंबाडे यांना ४०५३ मते मिळून दुसºया क्रमांकावर अपक्ष उमेदवार बारकू परशुराम डहाळे यांना तिसºया क्रमांकाची ३,३३५ मते मिळाली तर भाजपचे दौलत भीमा ससाणे यांना १६१७ मते मिळून ते चौथ्या क्रमांकावर राहिले. १२७ मतदारांनी नोटाचा वापर केला.
शेवटच्या फेरीत विजय
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्टÑवादीचे उमेदवार गुंबाडे हे आघाडीवर होते. सलग पाचव्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळणही सुरू केली. मात्र शेवटच्या सहाव्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र चारोस्कर यांनी गुंबाडे यांना मागे सारत थेट २३७ मतांची आघाडी घेऊन विजश्री खेचून आणली.

Web Title: Shiv Sena's Charoskar won from Govardhan group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.