शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नाशिक महापालिकेत शिवसेनेची भाजपाविरोधी रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:44 IST

आक्रमकतेवर भर : महाबळेश्वर शिबिराचे दिसणार परिणाम

ठळक मुद्दे येत्या महासभेत त्याचे प्रत्यंतर येण्याची शक्यताभाजपा हाच शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीतून दिसून येत आहे

नाशिक - महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे शिबिर नुकतेच महाबळेश्वरला पार पडले. या शिबिरातील प्रशिक्षणाचे परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता असून शिवसेनेने आपला प्रमुख विरोधक असलेल्या भाजपाविरोधी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या महासभेत त्याचे प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे.नाशिक महापालिकेसह सिन्नर, इगतपुरी, भगूर येथील नगरपालिकेतील नगरसेवकांचे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर महाबळेश्वर येथे नुकतेच पार पडले. याठिकाणी नगरसेवकांना सभागृहात कामकाज कशा प्रकारे करावे आणि कोणती आयुधे वापरावीत याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचे आदेशही पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले. त्यानुसार, नाशिक महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून यापुढे सत्ताधारी भाजपाविरोधी अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता असून तसे संकेतही महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिले आहेत. भाजपा हाच शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीतून दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला नामोहरम करण्याची आणि त्यांच्याकडून होणा-या गैर कारभाराचा पर्दाफाश करण्याची रणनीती आखली जात असून महासभांमध्ये त्याबाबत शिवसेना नगरसेवकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्याने शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, मुंढे यांच्याबाबतही सेनेने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली असून त्यांच्या कामकाजाची पद्धती व कल जाणून घेतल्यानंतरच त्यांच्या पाठिशी राहण्याचे ठरविल्याची चर्चा आहे. भाजपाला त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांबाबतही कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली जात आहे.भाजपा नगरसेवक थंडदोन महिन्यांपूर्वी महापालिकेतील भाजपा नगरसेवकांचेही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये शिबिर घेण्यात आले होते. शिबिरानंतर झालेल्या पहिल्याच महासभेला भाजपाच्या काही नवख्या नगरसेवकांनी चांगल्या कामगिरीचे दर्शन घडविले होते शिवाय शिवसेनेलाही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. परंतु, नंतर भाजपा नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा शैथिल्य आल्याचे दिसून येत आहे. त्यातच पदाधिका-यांमधील अंतर्गत वादामुळेही भाजपा नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका