येवल्यात शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST2021-02-06T04:25:44+5:302021-02-06T04:25:44+5:30

आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना नेते संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदींच्या नेतृत्वाखाली हे ...

Shiv Sena protests in Yeola | येवल्यात शिवसेनेची निदर्शने

येवल्यात शिवसेनेची निदर्शने

आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना नेते संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. डिझेल दरवाढ थांबलीच पाहिजे, मोदी सरकार हाय, हाय, जय भवानी, जय शिवाजी, केंद्र केंद्र सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय ! अशा विविध घोषणांनी तहसील कार्यालय आवार दणाणून गेला होता. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दयानंद जावळे, नगरसेविका सरोजिनी वखारे, शैलेष देसाई, छगनराव आहेर, किशोर सोनवणे, राहुल लोणारी, युवा सेना शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, चंद्रकांत शिंदे, संजय कासार, चंद्रकांत कासार, गणेश वडनेरे, अनंता आहेर, गणेश पेंढारी, जनार्दन भवर, शरद कुदळ, दीपक भदाणे, महेश सरोदे, चंद्रमोहन मोरे, नितीन संसारे, बापू गायकवाड, रवी काळे, जुबेर सौदागर, राशीद अख्तर, संजय कासार, दिलीप आहेर, बाजीराव देवडे, ज्ञानेश्वर दोडे, ज्ञानेश्वर वखारे, अरुण शिंदे आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- ०५ येवला शिवसेना आंदोलन

===Photopath===

050221\05nsk_43_05022021_13.jpg

===Caption===

फोटो- ०५ येवला शिवसेना आंदोलन

Web Title: Shiv Sena protests in Yeola