शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या सदस्यत्वासाठी शिवसेना न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:47 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपाचा एक सदस्य कमी जात असून, त्यामुळे सेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी यापक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपाचा एक सदस्य कमी जात असून, त्यामुळे सेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी यापक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी (दि. २५) त्यावर सुनावणी होणार असून, त्यात न्यायालयाने काही निर्णय दिलाच, तर २८ रोजी होणाऱ्या सदस्य निवडीवर त्याचा परिणाम होणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीत सध्या भाजपाचे नऊ तर विरोधकांचे सात असे सोळा सदस्य आहेत. महापालिकेच्या एकूण १२२ जागांपैकी भाजपाचे ६६ नगरसेवक निर्वाचित असल्याने या पक्षाचे तौलनिक संख्या बळ ८.६५ इतके होते, तर सेनेचे ३५ नगरसेवक असल्याने या पक्षाचे तौलनिक संख्याबळ ४.५९ टक्के इतके आहे. या अनुषंघाने स्थायी समितीवर भाजपाचे ९, तर सेनेचे चार सदस्य नियुक्त करण्यात आले होेते. परंतु भाजपाचे सातपूर विभागातील नगरसेवक सुदाम नागरे यांचे निधन झाल्याने भाजपाचे संख्याबळ ५९ ने घटले असून सेनेचे संख्याबळ त्या तुलनेत ६२ इतके होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक स्थायी समितीवर सदस्य म्हणून नियुक्त होऊ शकतो असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांनी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तआणि पीठासन अधिकारी म्हणून महापौर यांना पत्र दिले होते, परंतु त्यानंतर संबंधितांकडून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट उच्च न्यायलयातच याचिका दाखल केली असून, सोमवारी (दि. २५) सर्व संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.करवाढीबाबत बजावल्या नोटिसामहासभेचा ठराव होऊनही करवाढ कमी केली जात नसल्याने कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि अपक्ष यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी ४ मार्च रोजी होणार आहे. यासंदर्भात गुरुमित बग्गा, शाहू खैरे यांच्यासह अन्य विरोधकांनी सोमवारी (दि. २५) महापौर आणि आयुक्तांना नोटिसा बजावल्या आहेत.मंगळवारी (दि. २६) त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थायी समितीत सध्या भाजपाचे एका सदस्याचे बहुमत असून, ते गेल्यानंतर आता न्यायालयाच्या बाजूने कौल दिला तर समितीत भाजपाचे आठ सदस्य होऊ शकतात सेनेने मदत देऊ केली तर ते सभापतिपदासाठी अडवणूक करू शकतात. सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून युती जवळ आली असली तरी प्रत्यक्ष मात्र सत्तापदाची रस्खीखेच सुरूच असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक