शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक प्रचारात, नेते गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:49 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत मनसेसह शिवसेना आणि भाजपा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, सुरुवातीला सेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवाराच्या प्रचारात नेते गायब असल्याने शिवसैनिकच धुरा सांभाळताना दिसून येत आहेत. त्यामुळे सेना उमेदवार अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत मनसेसह शिवसेना आणि भाजपा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, सुरुवातीला सेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवाराच्या प्रचारात नेते गायब असल्याने शिवसैनिकच धुरा सांभाळताना दिसून येत आहेत. त्यामुळे सेना उमेदवार अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल रोजी होत असून, गेल्या सप्ताहापासून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. याशिवाय, उमेदवारांच्या प्रचारफेऱ्याही निघत आहेत. निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मनसेच्या वैशाली भोसले, सेनेच्या स्नेहल चव्हाण आणि भाजपाच्या विजया लोणारी यांच्यातच आहे. मनसेच्या उमेदवारासाठी माजी आमदार नितीन भोसलेंसह कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे व वत्सला खैरे तसेच राष्टÑवादीचे नगरसेवक गजानन शेलार हे प्रचारात सक्रिय झाले आहेत, तर भाजपाच्या उमेदवारासाठी स्थानिक पदाधिकारीही बूथ स्तरावर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करणाºया स्नेहल चव्हाण यांच्या प्रचारात मात्र स्थानिक नेते गायब असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी प्रभागात सेनेच्या वतीने प्रचारफेºयांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी मध्य विधानसभेच्या संपर्कप्रमुखाची धुरा सांभाळणारे मुंबईतील एक पदाधिकारी खास प्रचारफेरीसाठी नाशकात आले होते; परंतु स्थानिक नेत्यांमध्येच प्रचारफेºयांत सहभागी होण्याची उत्सुकता दिसून न आल्याने सदर पदाधिकाºयाने नाराजी व्यक्त करत मुंबई गाठल्याची चर्चा आहे. एका प्रचारफेरीसाठी खासदारांची उपस्थिती अपेक्षित धरण्यात आली होती; परंतु त्यांनीही पाठ फिरविल्याचे सांगितले जाते.  पक्षात गेल्या काही दिवसांत झालेले फेरबदल आणि घडामोडी यामुळे अंतर्गत गटबाजीला उधाण आले असून, त्याचा फटका पोटनिवडणुकीला बसण्याची भीती शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. शिवसैनिक प्रचारफेºयांत सहभागी होत असताना नेते मात्र सोयीस्कररीत्या केवळ हजेरी लावत असल्याने उमेदवार अडचणीत आल्याचीही चर्चा आहे.नात्यागोत्याचे राजकारणपोटनिवडणुकीत नात्यागोत्याचेही राजकारण दिसून येत आहे. मनसेच्या उमेदवाराचे कॉँग्रेसच्या नगरसेवकांशी नातेसंबंध आहेत. शिवाय सेनेतील काही पदाधिकाºयांशीही त्यांचे नाते आहे. त्यामुळे उघडपणे प्रचारात येणे टाळले जात असल्याची चर्चा आहे. मनसेकडून दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांवर मते मागितली जात आहेत, तर शिवसेना-भाजपाकडून प्रभागाचा विकास करण्याची आश्वासने दिली जात आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक