नाशिक : महाडनजीक सावित्री नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पूल अथवा मोरीवरून पाणी वाहत असेल तर पाण्यातून गाडी चालवू नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार एस. टी. महामंडळाकडून काळजी घेण्यात आली असून, चालक-वाहकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, त्र्यबकेश्वर तालुक्यातील शिवणगाव तसेच निफाड तालुक्यातील चांदुरी-सायखेडा येथील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
शिवणगाव, सायखेडा पूल वाहतुकीस बंद
By admin | Updated: August 6, 2016 00:57 IST