या संदर्भात अलीम सलीम खाटीक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ८) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला. जावीद खाटीक व अलीम खाटीक हे पिकअपवरून (क्रमांक एम. एच. ४८, एजी ८७६१) शेळ्या भरून कल्याणकडे जात असताना मुंबई - आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी पिकअपच्या दरवाजाजवळ येत गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबविली नसल्याने दुचाकीवर बसलेल्या एकाने बंदूक काढून गोळीबार केला. यात जावीद खाटीक हे जखमी झाले आहेत. रिजवान पार्क ते जनता सायझिंग दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही. एल. भोये हे करीत आहेत.
मालेगावी गोळीबारात शेंदुर्णीचा तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST