शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत 'तिने' बजावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:50 IST

नाशिक - कोरोनाच्या महामारीचे संकताट जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत असून, मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्राच्या आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्याने भरलेल्या नदीतून वाट काढत आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या या कर्तव्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सलाम केला आहे.

नाशिक - कोरोनाच्या महामारीचे संकताट जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत असून, मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्राच्या आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्याने भरलेल्या नदीतून वाट काढत आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या या कर्तव्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सलाम केला आहे.गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत. कोरानाची साथ सर्व ठिकाणी चालू असताना नाशिक जिल्'ामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. केवळ कोविडचे काम न करता नियमित लसीकरण, प्रसूती आणि प्रसूतीपश्चात सेवा अविरतपणे देत आहेत. नाशिक जिल्'ातील मालेगाव शहर व ग्रामीण भागामध्ये अर्धवार्षिक पल्स पोलिओ मोहिम 20 सप्टेंबर रोजी राबविण्यात आली जी बालके लस घेण्यासाठी बुथवर येऊ शकली नाही त्यांना घरी जाऊन पोलिओ लस देण्याचे काम सध्या सुरू आहे. मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कर्मचारी मालुताई अहिरे यांनी नदीमध्ये तुडुंब पाणी असताना आवश्यक आरोग्यविषयक साहित्य घेवून बालकांना पोलिओचा डोस देण्याचे काम केले आहे. दरम्यान, नदीतून कमरे इतक्या पाण्यातून वाट काढतानाचे त्यांचे छायाचित्रे समाज माध्यमातून व्हारल होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.यंत्रणेचे काम प्रेरणादायीनाशिक जिल्हयाच्या प्रत्येक खेडया-पाडयात प्रत्येक घरासमोर जाऊन 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरु आहे. कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. आपले नियमित काम सांभाळून हे कर्मचारी समाजासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहेत. या सर्वांचे काम प्रेरणादायी असून बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातून वाट काढून कर्तव्य बजावणा-या मालेगाव तालुक्यातील आशा कर्मचारी चा जिल्हा परिषदेला अभिमान आहे.- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद