शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमेव जयते...

By किरण अग्रवाल | Updated: April 29, 2018 13:59 IST

एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो.

ठळक मुद्दे मैलोन्मैल डोक्यावर हंडे-गुंडे घेऊन त्यांना पायपीट करावी लागते.जिल्ह्यातील सिन्नर व चांदवडसारखे तालुके तर कायम दुष्काळी असतात.वर्षोन्वर्ष तेथे शासकीय योजना राबविल्या जातात. पण टंचाई काही दूर होत नाही.

सर्वच बाबतीत केवळ शासनावर विसंबून राहणे योग्य ठरणारे नाही. विकासाच्या बाबतीत किंवा कसल्याही समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत सरकार प्रयत्नशील असतेच, पण सरकारी प्रयत्नाला लोकसहभागाची साथ लाभली तर चित्र झपाट्याने बदलता येते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना व पानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांकडे याचदृष्टीने पाहता येणारे आहे.एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो. मैलोन्मैल डोक्यावर हंडे-गुंडे घेऊन त्यांना पायपीट करावी लागते. उन्हाचा चटका व दुष्काळातील होरपळ काय असते हे खरेतर या माय-भगिनींना विचारायला हवे. जिल्ह्यातील सिन्नर व चांदवडसारखे तालुके तर कायम दुष्काळी असतात. वर्षोन्वर्ष तेथे शासकीय योजना राबविल्या जातात. पण टंचाई काही दूर होत नाही. म्हणूनच प्रख्यात समाजसेवी शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वातील भारतीय जैन संघटना व अभिनेते आमिर खान यांच्या पानी फाउंडेशनने या दोन्ही तालुक्यांतील शंभरपेक्षा अधिक गावांमध्ये पाणी अडविण्यासाठी व ते जमिनीत जीरवण्यासाठी श्रमदानातून अनेकविध कामे हाती घेतली आहेत. दुष्काळातील होरपळमुळे डोळ्यात पाणी येते हे खरे, पण आता डोळ्यात पाणी आणायचे नाही, तर गावात पाणी आणायचे; असा निर्धार करून गावकरी या अभियानात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह त्यांची यंत्रणाही यात हिरीरीने सहभागी झालेली दिसत आहे. एरव्ही तटस्थ राहणाऱ्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशही या मोहिमेत सहभागी झालेले दिसून आले. अनेक नोकरदार कामाच्या ठिकाणी रजा टाकून, तर श्रमिक वर्ग मोलमजुरीला न जाता श्रमदान करीत आहेत. जणू जागोजागी गावशिवारात श्रमदानाचे तुफानच आले आहे. आपले गाव पाणीदार व्हावे, टॅँकरमुक्ती साधावी म्हणून हे श्रमदान सुरू आहे. यातील संबंधितांची सामाजिक जाणीव महत्त्वाची असून, त्यामुळेच श्रमदानाला गावक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे जो इतरांसाठी प्रेरक ठरला आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत हे तुफान आले असले तरी ‘श्रमेव जयते’चाच आदर्श त्यातून घडून येत आहे. म्हणून त्यासाठी पुढाकार घेणाºया जैन संघटना व पानी फाउंडेशनचे तर कौतुक करावे तेवढे थोडे आहेच, पण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आलेल्या ग्रामस्थांचा या मोहिमेतील अनुकरणीय सहभाग विशेष गौरवास्पद आहे. सामाजिक जाणिवांचे हे तुफान चांदवड व सिन्नर तालुक्यांखेरीज अन्यही तालुक्यात घोंगावावे आणि त्यासाठी अन्य स्थानिक सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा एवढेच यानिमित्ताने.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाNashikनाशिकdroughtदुष्काळ