कळवण : सन २०१९-२० च्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गेल्या १५ वर्षापासून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यालयातील शाहू प्रशांत पाटील याने ९६.०४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्र मांक मिळविला.अक्षदा सुनिल नालकर या विद्यार्थिनीने ९६.०२ टक्के गुण मिळवून व्दितीय क्र मांक मिळविला. संकल्प गुर्जर याने ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक मिळविला. गितिका बिजू हिने ९४ टक्के तर श्रवण संदेश निकुंभ याने ९३.०२ टक्के गुण मिळवून अनुक्र मे चौथा व पाचवा क्र मांक मिळविला.विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले. २९ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के दरम्यान गुण मिळविले. ३४ विद्यार्थी ७० ते ८० टक्के दरम्यान गुण मिळवून उत्तीर्ण झाले, उर्वरीत विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले. (५ फोटो नावाप्रमाणे)
शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 16:00 IST
कळवण : सन २०१९-२० च्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गेल्या १५ वर्षापासून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यालयातील शाहू प्रशांत पाटील याने ९६.०४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्र मांक मिळविला.
शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के
ठळक मुद्देकळवण : शाहू पाटील ९६.०४ टक्के गुण मिळवून प्रथम