शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेकडून राज्यात पोरखेळ चाललाय, शरद पवार यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:03 IST

सत्तास्थानांच्या वाटपावरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे.

नाशिक - सत्तास्थानांच्या वाटपावरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेनेकडून पोरखेळ सुरू आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी आज नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली. राज्यात सत्तास्थापनेच्या नावाखाली भाजपा आणि शिवसेनेकडून पोरखेळ सुरू आहे, असा टोला पवार यांनी लगावला. दरम्यान, महायुतीतील मतभेदांमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सध्याची परिस्थिती तसेच विधानसभा निकालांसंदर्भात माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडे निवेदन देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे शेतकाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी आपण सरकारकडे करु, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी आज नाशिकमधील शेतकऱ्यांना दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा