वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद सखाहारी खुळे यांची, तर उपाध्यक्षपदी यासीन गुलाब दस्तगीरभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून आवर्तन पद्धतीने सचिन पंडित खुळे यांनी अध्यक्षपदाचा आणि नितीन गीताराम खुळे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही रिक्त जागांसाठी सोमवारी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक संदीपकुमार रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी शरद खुळे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब सूर्यभान खुळे यांनी मांडली. त्यास बाळासाहेब खुळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी यासीन गुलाब दस्तगीर यांच्या नावाची सूचना राहुल खुळे यांनी मांडली. त्यास सचिन खुळे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने आणि दोन्ही अर्ज वैध ठरल्याने या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी रूद्राक्ष यांनी केली.बैठकीस संचालक बापू शिवाजी खुळे, मीराबाई भागवत खुळे, मंगला रावसाहेब खुळे, नारायण शिवराम कांदळकर, आनंदा धोंडीराम अढांगळे, नितीन गीताराम खुळे, रघुनाथ कचरू खुळे, शेखर रंगनाथ खुळे, सुदेश खुळे, रामदास खुळे, पंढरीनाथ खुळे, शिवाजी खुळे, विलास उगले, शंकर गडाख, भाऊसाहेब खुळे आदी उपस्थित होते.
वडांगळी येथील सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद खुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:13 IST
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद सखाहारी खुळे यांची, तर उपाध्यक्षपदी यासीन गुलाब दस्तगीरभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वडांगळी येथील सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद खुळे
ठळक मुद्देरिक्त जागांसाठी सोमवारी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक संदीपकुमार रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली.