शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:25 IST

येथील नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरु ंद होऊन सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण करून सीमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी नगरपंचायतीने शहरातील अतिक्रमणांवर हातोडा चालवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

कळवण : येथील नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरु ंद होऊन सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण करून सीमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी नगरपंचायतीने  शहरातील अतिक्रमणांवर हातोडा चालवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.शहरातील रस्ते काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा ठरलेली अतिक्र मणे हटवण्याचा निर्धार नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी केला असल्याने रस्ते विकासकामांमध्ये अडथळा ठरू पहाणाºया नगरपंचायतीकडे जाणाºया शाहीर लेन व राम मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणांवर नगरपंचायतीने जेसीबी फिरवला. या कारवाईमुळे अतिक्र मणधारकांचे धाबे दणाणले आहेत.  शहरांतर्गत कॉलनी, चौक व रस्त्यांवर छोट्या-मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी ही डोकेदुखी ठरल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नगरपंचायतने पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी सावरकर चौक, माउली चौक, मशीद परिसर व रविवारी शाहीर लेन या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली. अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आदेश दिले होते. शाहीर लेन व राम मंदिर परिसरातील रस्त्यांवरील जुन्या गटारीवर नागरिकांनी अतिक्र मण करून बांधलेल्या पायºया, ओटे, लोखंडी जिने आदी अतिक्रमणेहटवण्यात आली. तत्पूर्वी स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काहींनी स्वत: पुढाकार घेऊन अतिक्र मण काढून घेत नागरिकांनी अतिक्रमण काढण्याबाबत नगरपंचायतीला सहकार्य केले, तर काहींनी अतिक्रमण्े काढली नाही. पुन्हा अतिक्र मण होणार नाही यासाठी नगरपंचायतीने पावले उचलावीत, अशी मागणी पुढे आली आहे.अतिक्र मणधारकांना नोटिसाकळवण नगरपंचायतीच्या वतीने शहरांतर्गत रस्त्यांचे व गटारी दुरु स्तीचे काम सुरू आहे. या कामात अडथळा ठरू पाहणाºया अतिक्र मणसंदर्भात अतिक्रमणधारक, टपरीधारकांना आपापली अतिक्र मण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र अतिक्र मणे काढण्यात आली नाही. मुख्य अधिकारी डॉ. पटेल यांनी जेसीबी चालवून अतिक्र मण हटवले.  डॉ. न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिर या शिवाजीनगर अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्र मणे करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला होता. या अरुंद रस्त्यावरून होणारी वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून या रस्त्याचे रु ंदीकरण करण्याचे काम हाती घेतल्यावर या रस्त्यावरील सर्व अतिक्र मणे काढण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक