शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शहाजहॉनी ईदगाह : देशाची एकात्मता बळकट करण्याचा समाजबांधवांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:33 IST

नमाजपठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव मैदानात जमले होते. सकाळी साडे आठ वाजेपासून मैदानाच्या दिशेने समाजबांधवांची पावले चालत होती.

ठळक मुद्देशहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नमाजपठणअकरा वाजता सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला.महापालिकेच्या वतीने पाण्याची मुबलक व्यवस्था

नाशिक : बंधुभाव, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद शनिवारी (दि.१६) शहरात अभुतपूर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सकाळी विशेष नमाज ऐतिहासिक शहाजहॉनी ईदगाह मैदानावर अदा केली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याने डोळ्यांची पारणे फेडली.मानवतेची शिकवण आणि आत्मशुध्दीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या १ तारखेला शनिवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदनिमित्त सालाबादप्रमाणे ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. नमाजपठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव मैदानात जमले होते. सकाळी साडे आठ वाजेपासून मैदानाच्या दिशेने समाजबांधवांची पावले चालत होती. पारंपरिक पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी परिधान करुन विशेष श्लोक (तस्बीह) पठण करत घरातून मुस्लीम बांधव ईदगाहच्या दिशेने बाहेर पडले. ईदगाह मार्गावर विविध लोकप्रतिनीधींसह राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी नातवंडांसोबत ईदगाहवर हजेरी लावली. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर शुचिर्भूत होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती.नऊ वाजेच्या सुमारास हाजी सय्यद मीर मुख्तार यांनी ईदगाहवर प्रवचनास प्रारंभ केला. रमजान पर्वमध्ये केलेली उपासना सार्थकी लागावी, यासाठी त्यांनी यावेळी धनिक मुस्लीमांना नमाजपठणापुर्वी ‘जकात’, ‘फित्रा’ देण्याचे आवाहन केले. एकात्मता, अखंडता, आपआपसांमधील बुंधभाव ही आपल्या देशाची ताकद आहे. देशाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी एकात्मता अधिकाधिक बळकट करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. दहा वाजून दहा मिनिटाला खतीब यांनी नमाजपठणाला प्रारंभ केला. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरुदोसलामचे उपस्थित जनसमुदायाकडून पठण करण्यात आले. अकरा वाजता सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईदRamzanरमजानNashikनाशिक