शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या शहाजहाँनी इदगाहमध्ये एकात्मतेसाठी 'दुवा'; हलक्या सरींच्या वर्षावात ईद ची नमाज अदा

By अझहर शेख | Updated: June 29, 2023 15:54 IST

सोहळा शहाजहाँनी इदगाहमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.

अझहर शेख, नाशिक : ए मेरे मौला, हमारे मुल्क ए भारत में अम्न-अमान कायम रख और भारत को तरक्की अता फरमा...अशी दुवा बकरी ईदच्या औचित्यावर सामूहिक नमाजनंतर शेकडो समाजबांधवांनी मागितली. गुरुवारी (दि.२९) शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात सोहळा शहाजहाँनी इदगाहमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.

त्याग, बलिदानाची शिकवण देणारी ईद-उल-अज़ा अर्थात बकरी ईद सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवारी नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावात नमाजपठण मुस्लीम बांधवांकडून पूर्ण करण्यात आले. सकाळी 9 वाजता सोहळा सुरू झाला. प्रारंभी मौलाना जफर व मौलाना महेबूब आलम यांनी बकरी ईद व कुर्बानीबाबत प्रवचनातून माहिती दिली. सकाळी साडे आठ वाजेपासून समाजबांधव मैदानात जमण्यास सुरुवात झाली. कोणी रेनकोट परिधान करून तर कोणी हातात छत्री घेत मैदानात येत होते. मैदानाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी पायात अशा पोशाखात नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती मनपाकडून शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते. 

शुचिर्भूत झाल्यानंतर सोबत आणलेली चटई पसरवून त्यावर एका रांगेत सर्व स्थानपन्न झाले. दोन्ही धर्मगुरूंचे प्रवचन संपताच  शहर ए खतीब यांनी उपस्थितांना ईद च्या नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि सामूहिक नमाजला दहा वाजता प्रारंभ करण्यात आला. विशेष दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी एकाग्रतेने ते ऐकले. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामूहिक पठनाने सोहळ्याची  साडे दहा वाजता सांगता झाली.  यानंतर उपस्थितांनी एकमेकांची गळाभेट घेत 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक