शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शबरी वित्त व विकास महामंडळाच्या वसुलीअभावी योजनांना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:00 IST

राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शबरी वित्त व विकास महामंडळच लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीअभावी वनवासात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील लाभार्थ्यांना ८५ कोटींचे क र्जवाटप करण्यात आले असून, यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास १,०४८ लाभार्थ्यांना वितरित केलेल्या १२ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे.

नाशिक : राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शबरी वित्त व विकास महामंडळच लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीअभावी वनवासात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील लाभार्थ्यांना ८५ कोटींचे क र्जवाटप करण्यात आले असून, यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास १,०४८ लाभार्थ्यांना वितरित केलेल्या १२ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. परंतु, कर्जाच्या रकमेची वसुलीच होत नसल्याने महामंडळाला कर्जपुरवठ्याच्या विविध योजनांना कात्री लावावी लागली आहे.  महामंडळाच्या थकीत कर्जाची रक्कम ही ८५ कोटींवर पोहोचल्याने सरकारने या महामंडळाची नवीन कर्जहमी घेण्यास नकार दिला असून, गेल्या तीन ते चार वर्षांत केवळ पाच ते सहा टक्के लाभार्थ्यांकडूनच कर्जाची वसुली होऊ शकली असून, अद्यापही तब्बल ९६ टक्के लाभाथ्यांकडे ८३ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, वसुलीची प्रक्रियाही ठप्प आहे. आदिवासी युवकांना २००० सालापासून शबरी वित्त व विकास महामंडळामार्फत रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासह विविध प्रकारचे अर्थसहाय्य करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, सन २००६ पासून या महामंडळाच्या कारभाराला उतरती कळा लागली असून, हे महामंडळ केवळ राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचे साधन बनले. महामंडळाच्या कर्जपुरवठ्याच्या योजनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी २००८ मध्ये शासनाने लाभार्थी कर्जदारांचे जवळपास २४ कोटींचे व्याज माफ केले होते. परंतु त्याचाही वसुलीत काहीही उपयोग झालेला नाही. या थकीत कर्जामुळे महामंडळाची थकबाकी आता ८३ कोटींपर्यंत पोहचली असून, कर्जाच्या वसुलीअभावी महामंडळ डबघाईला आले आहे.थकबाकीदारांचा आकडा वाढलाशबरी विकास महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ७५ टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असे, तर १० टक्के राष्ट्रीयीकृत बँक व १५ लाभार्थ्यांचे अनुदान मिळून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते. परंतु, २००६ पासून या कर्जाची परतफेड करणाऱ्यांची संख्या घटल्याने थकबाकीचा आकडा सातत्याने वाढत गेला. अखेर महामंडळाला कर्जपुरवठ्याच्या विविध योजनांना कात्री लावण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षे योजना पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :MONEYपैसा