डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिनाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजेश गडाख होते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी प्रास्ताविक केले. शालेय प्रतिनिधी अश्विनी आनंद शिंदे, दर्शन दिनेश चौधरी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व मदर टेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्थेचे सचिव राजेश गडाख यांनी सामाजिक जाणिवेतून शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात. त्यांचे कार्य इतर कार्यापेक्षा खरोखरच उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. याप्रसंगी शाळेतील संस्कृती गुरुळे, भविष्य कुदळे, श्रावणी मोरे, शाहू शिंदे, समर्थ डावरे, साक्षी खळतकर, रूपेश पाटील यांनी शिक्षक दिनाबद्दल माहिती सांगितली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी शाळेतील शिक्षक पांडुरंग लोहकरे व मदर टेरेसा यांच्या जीवनकार्याविषयी सतीश बनसोडे यांनी माहिती सांगितली. नीलेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले तर सतीश बनसोडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे, बापू चतुर, सोमनाथ थेटे, भास्कर गुरुळे, पांडुरंग लोहकरे, सागर भालेराव, जिजाबाई ताडगे, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, अमोल पवार, मंदा नागरे, कविता शिंदे, गणेश सुके, सुधाकर कोकाटे, पदमा गडाख, योगेश चव्हाणके, नीलेश मुळे, शिवाजी कांदळकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.