शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चालू महिन्यात मिळणार सातवा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:06 IST

महापालिकेच्या सुमारे पावणे पाच हजार कर्मचाऱ्यांना अखेरीस येत्या ७ मेस सातव्या वेतन आयोगानुसार वेतन हाती पडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिलपासून प्रत्यक्षात वेतन देण्याचे ठरले असले तरी एप्रिल पेड इन मे म्हणजे गेल्या महिन्याचे वेतन देताना आता वाढीव वेतन महापालिका अदा करणार आहे.

ठळक मुद्देमनपा कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली: फरकाबाबतचा निर्णय मात्र प्रलंबित

नाशिक- महापालिकेच्या सुमारे पावणे पाच हजार कर्मचाऱ्यांना अखेरीस येत्या ७ मेस सातव्या वेतन आयोगानुसार वेतन हाती पडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिलपासून प्रत्यक्षात वेतन देण्याचे ठरले असले तरी एप्रिल पेड इन मे म्हणजे गेल्या महिन्याचे वेतन देताना आता वाढीव वेतन महापालिका अदा करणार आहे.  केंद्र शासनानंतर राज्य शासनाने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू केला. महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली असली तरी त्यासाठी शासनाच्या मान्यतेची गरज होती. त्यातच राज्य शासनाने महापालिकांना शासकीय पद समकक्ष वेतनश्रेणी देता येईल अशी अट घातली. नाशिक महापालिकेत चौथ्या वेतन आयाेगावर दहा टक्के वेतनवाढ देण्यात आली असल्याने त्यांचे वेतन अनेक शासकीय पदांवरील अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. शासनाकडे याबाबत पत्रापत्रीही झाली होती. परंतु शासन ऐकण्यास तयार नव्हते. अखेरीस पे प्रोटेक्शनचा पिंप्री चिंचवड फाॅर्म्युला वापरण्यात आला. आणि कोणाचे वेतन कमी होणार नाही अशा पद्धतीने आयोग लागू करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू झाला असला तरी प्रत्यक्षात वेतन मात्र मे महिन्याच्या ७ तारखेस हाती पडणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वेतन ६ आणि ७ मेस रोजी मिळणार आहे. अडीचशे कर्मचाऱ्यांना मात्र प्रतीक्षाशासनाने शासकीय पद समकक्ष वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र १३ संवर्गातील सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांची पदे अशी आहेत की जी राज्य शासनाच्या पदांत समाविष्ट नाही त्यांच्या वेतनश्रेणी बाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, तो मंजूर झालेला नाही. तो मंजूर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू होईल, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका7th Pay Commissionसातवा वेतन आयोग