शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:48 IST

‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.

नाशिक : ‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या विवाहाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे शहरात येणार असल्याचे गृहीत धरून सुकाणू समितीचे सतरा कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर दानवे यांना ‘बुक्का’ लावून औंक्षण करत काळी शाल व पोशाख देऊन सत्कार करण्यासाठी जमले होते. या आंदोलनाची कुणकुण मुंबई नाका पोलिसांना लागताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासह मुंबई नाका पोलिसांचे पथक विश्रामगृहावर दानवे यांच्या आगमनाअगोदरच येऊन पोहचले. यावेळी आगळ्या अपारंपरिक सत्काराच्या हेतूने एकत्र आलेल्या सुकाणूच्या त्या १७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कार्यकर्त्यांना भुजबळ यांनी फौजदारी प्रक्रियेनुसार कलम ११ अन्वये नोटीस बजावली आहे. सदर नोटिसीद्वारे भविष्यात त्या १७ कार्यकर्त्यांच्या वर्तनावरून कुठल्याही प्रकारे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधितांकडून सहा महिन्यांच्या दीर्घ मुदतीचे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र का घेतले जाऊ नये? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे सोमवारी (दि.२७) सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत संबंधितांनी त्यांचे म्हणणे सादर न केल्यास आपले कुठलेही म्हणणे नाही, असे समजून पोलीस अहवालानुसार कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. एकूणच सदर नोटीस बजावून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक शांततेचा व कायदा सुव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारे भंग करणाºया आंदोलनापासून लांब राहण्याचा इशाराच दिला आहे. सतरा कार्यकर्ते अपारंपरिक सत्कारासाठी जमले होते. त्यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून भविष्यात शहरात कुठल्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र सहा महिन्यांच्या मुदतीचे भरून का घेतले जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.- डॉ. राजू भुजबळ, सहायक आयुक्त

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा