शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याविना होणार सातबारा फेरफार नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:56 IST

जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणार आहे. शासनाच्या या आदेशान्वये आता तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होऊन नागरिकांचा वेळ व पैशातही बचत होणार आहे.

एकलहरे : जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणार आहे. शासनाच्या या आदेशान्वये आता तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होऊन नागरिकांचा वेळ व पैशातही बचत होणार आहे.सातबारा संगणकीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून यापुढे जमीन, जागा, घर, प्लॉट इत्यादी खरेदीची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी कार्यालयाकडूनच आॅनलाइन यंत्रणेद्वारे थेट तलाठ्यांच्या आॅनलाइन डेस्कला दस्ताची माहिती व संबंधित कागदपत्रे पाठवण्यात येतील. त्यावर तलाठ्यांनी १५ दिवसांत फेरफार अर्थातच खरेदी केलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद करावी. असे आदेश राष्टÑीय भूमी अभिलेख आधुनिकीकरणाचे समन्वयक रामदास जगताप यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  तलाठ्यांनी फेरफारची पंधरा दिवसांत नावनोंदणी करावी, अशी मुदत देण्यात आली असून, या मुदतीत तलाठ्यांनी नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत नोंद न केल्यास तलाठी यांच्याकडे किती नोंंदी प्रलंबित आहेत, हे आॅनलाइन प्रक्रियेत तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाºयांना दिसणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयonlineऑनलाइन