खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कनकापूर (कांचने ) गावाने सात दिवस जनता कर्फ्यू घोषित केला आहे . यामुळे गावातील सर्व छोटे मोठे दुकाने बंद करण्यात आली असून,नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन ग्रामकोरोना समितीने केले आहे . ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंतेत भर पडली आहे . कणकापूर, कांचने गावा लगत असलेल्या कानमंडाळे गावात कोरोणा सदृश्य रु ग्ण आढळल्याने येथील नागरिकांचा या गावाशी सतत संपर्क येत असून याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता समितीच्यावतीने अत्यावश्यक सेवा वगळता दि बुधवार दि २२ पर्यंत सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये ,घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकाना शंभर रु पये दंड आकारण्यात येईल. गावातील सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे आवश्यक असून ,या प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे .
कणकापूर गावात सात दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:17 IST