वाहेगावसाळ : चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील ह.भ.प. यादव महाराज यशवंत गिते हे पाऊस पडावा म्हणून सात दिवसांपासून महादेवाच्या मंदिरात अनुष्ठानास बसले आहे. यावेळी तळेगावरोही येथील महादेव मंदिरात पोथी पूजन करून महादेवाच्या नामाच्या गजरात तळेगावरोही येथील भजनी मंडळाने धार्मिक विधी करून पावसाला साकडे घातले आहे. ही तपश्चर्या सात दिवस ह.भ.प. गिते हे करणार आहे. या कार्यक्रमास तळेगावरोही ग्रामस्थ व भजनी मंडळ उपस्थित होते.
सात दिवसांचे अनुष्ठान
By admin | Updated: July 17, 2014 00:32 IST