शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

मुद्रांक घोटाळ्यातील सातही आरोपी निर्दोष मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:48 IST

देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील सातही अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़ ३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़

ठळक मुद्देरेल्वेतून मुद्रांक चोरी प्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल

नाशिक : देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील सातही अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़ ३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचा २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झाला आहे. सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील ए़ के.मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ एस़ बी़ घुमरे, अ‍ॅड. शिवनाथ ढिकले व एम़ वाय़ काळे यांनी काम पाहिले़नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात छापले जात असलेले स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनद्वारे देशभरात पाठविले जातात़ मात्र, रस्त्यातच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी रेल्वे बोगीचे सील तोडून स्टॅम्पची चोरी करून ते अब्दुल करीम तेलगी यास विक्री करीत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, दिल्ली (सीबीआय) यांच्या आर्थिक गुन्हे शाखेस मिळाली होती़नाशिकच्या विशेष न्यायालयात सीबीआयने २००५ मध्ये हजारो पानी दोषारोपपत्र दाखल केले होते तर फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली होती़ यामध्ये सीबीआयचे वकील व आरोपीच्या वकिलांनी ४९ साक्षीदार तपासले़ विशेष म्हणजे या खटल्यात साक्षीदारांनी कोणाचीही नावे घेतली नाहीत तर काही साक्षीदारांनी सीबीआयने न सांगता जबाब घेतल्याचे सांगितले़ न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांच्या न्यायालयात सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ नसल्याने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली़ तसेच स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे वा पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड़ एस़ बी़ घुमरे, अ‍ॅड. ढिकले व एम़ वाय़ काळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़नाशिक कोर्टात हजर झाला होता तेलगीअब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्यास काही गुन्ह्णांमध्ये जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर रेल्वे बोगीतून स्टॅम्प पेपरची चोरी केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्णाचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर केले होते़ मात्र, जोपर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तोपर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सांगत त्यासाठी पाठपुरावा केला. त्यातच तेलगीला एड्स झाल्यामुळे न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खूप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैदराबाद तर कधी बंगळुरू न्यायालयात पाठपुरावा करून अखेर २०१३ मध्ये तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले. अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला होता़विशेष सीबीआय न्यायालयात खटला१६ डिसेंबर २००३ मध्ये गुन्हा दाखल करून नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ यामध्ये तेलगीसह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी), ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), मोहम्मद सरवर (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), विलास जनार्दन मोरे (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), ज्ञानदेव रामू वारके (हवालदार, रेल्वे सुरक्षा बल) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तसेच कट रचण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय