शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सिंहस्थ निगडित कामांचा वेगळा प्रस्ताव

By admin | Updated: May 28, 2014 01:29 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येणार्‍या कामांबरोबरच त्याच्याशी निगडित असलेल्या अन्य कामांचा वेगळा प्रस्ताव तयार करून त्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येणार्‍या कामांबरोबरच त्याच्याशी निगडित असलेल्या अन्य कामांचा वेगळा प्रस्ताव तयार करून त्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या कामांमध्ये लोकप्रतिनिधींनीही सुचविलेल्या कामांचा समावेश केला जावा, अशा शासनाच्या सूचना असल्याने काही लोकप्रतिनिधींनी कुंभमेळा आराखड्यासाठी काही कामे सुचविली होती. विशेष करून आमदार माणिकराव कोकाटे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी जातात व सिन्नर येथे थांबतात, त्याचा ताण सिन्नर नगरपालिकेवर पडेल. त्यामुळे आरोग्य व पाण्याची सोय करण्यासाठी सिंहस्थ निधीतून तरतूद करावी. त्याचबरोबर शिर्डी येथे पायी जाणार्‍या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता करण्याची मागणीही त्यांनी केली होती. प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यात यातील कामे न घेतल्याबद्दल कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली, तर अशाच प्रकारची मागणी इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी केली. सिंहस्थानिमित्त त्र्यंबकेश्वरला येणारे भाविक पेगलवाडीपर्यंत जातात. त्यामुळे याठिकाणी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करावी, अशी विनंती त्यांनी केली. नाशिक शहरातीलही लोकप्रतिनिधींनी काही कामे सुचविली आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी सिंहस्थ निधी देता येणार नाही; मात्र त्याच्याशी निगडित कामे म्हणून स्वतंत्रपणे त्याचा प्रस्ताव करून शासनाकडून त्याला मंजुरी व निधी मिळवणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.