शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

नाशकात एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दोन महिला डॉक्टरांविरुध्द रॅगिंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 18:02 IST

पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते.

ठळक मुद्देस्वप्नील रॅगींगचा बळी?दीड वर्षापासून शिंदे आडगाव मेडिकल कॉलेजमध्येशिंदे यांचा 'व्हीसेरा' अहवाल राखून ठेवण्यात आला आहेमुलाचा घातपात झाल्याची मयत स्वप्नील यांच्या वडिलांनी तक्रार

नाशिक : आडगाव शिवारात असलेल्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकिय शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुळ बीड जिल्ह्यातील डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे (२६) यांचा कॉलेजमध्ये झालेल्या मृत्युने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यु संशयास्पद असून त्यांच्यासोबत शिकणाऱ्या दोन महिला डॉक्टरांनी घातपात केल्याचा संशय शिंदे यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित दोन महिला डॉक्टरांसह महाविद्यालयाच्या अधिष्ठाताविरुध्द तक्रार दिली आहे. पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते त्यांना तत्काळ उपचारासाठी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. गेल्या एक दीड वर्षापासून शिंदे आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी पदव्युत्तर पदवी पुर्ण करण्यासाठी बीड येथून दाखल झाले होते. त्यांच्या अचानकपणे झालेल्या मृत्युने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला. दरम्यान, शिंदे यांचा 'व्हीसेरा' अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण बुधवारपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते. याप्रकरणी आडगव पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१७) अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याची तक्रार मयत स्वप्नील यांच्या वडिलांनी अर्जाद्वारे आडगाव पोलिसांकडे केली आहे.स्वप्नील रॅगींगचा बळी?स्वप्नील यांची त्यांच्या वैद्यकिय महाविद्यालयातील दोन महिला डॉक्टरांकडून रॅगिंग केले जात असल्याची महाविद्यालयाच्या कॅम्पस वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, स्वप्नील यांचे वडिलांनी दिलेल्या तक्रार अर्जात मात्र दोन महिला डॉक्टरांच्या नावांचा उल्लेख केलेला असून या दोघींपासून माझ्या जिविताला धोका असल्याचे स्वप्नील नेहमी सांगत होता, असेही म्हटले आहे. या दोन्ही डॉक्टरांसोबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि दुसऱ्या एका महिला डॉक्टराने मिळून संगनमत करुन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.-मयत स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. स्वप्नीलवर ताण-तणावाविरुध्द संघर्ष करत होता त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी यापुर्वी कधीही रॅगिंगबाबतची कोणतीही तक्रार केलेली नाही. फेब्रुवारीपासून तो पाच महिने बीड येथील त्याच्या घरीच राहत होता. जुलैपासून स्वप्नीलसोबत त्याच्या आईदेखील कॅम्पसमधील वसतीगृहात राहत होत्या. मंगळवारी सकाळी तो चेंजींग रुमच्या टॉयलेटमध्ये पडला होता. वॉर्डबॉय यांच्या मदतीने त्याला बाहेर काढत तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले; मात्र रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज

टॅग्स :NashikनाशिकMedicalवैद्यकीयPolice Stationपोलीस ठाणे