शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर सेनेची सभासद नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 18:29 IST

यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी, सर्वात कसोटीचा प्रसंग शिवसेनेवर आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाबरोबर युती न केल्यास स्वबळावर लढावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सारी भिस्त शिवसैनिकांवर राहणार आहे. मित्रपक्षाबरोबरच विरोधकांशी दोन हात करावे लागणार

ठळक मुद्देतीन लाखांचे उद्दिष्ट : यंदा विक्रम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने देशपातळीवर सभासद नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, सन २०१८ ते २०२० पर्यंत सभासदत्व बहाल करणाऱ्या या नोंदणीचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यासाठी यंदा सुमारे तीन लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सभासद नोंदणी होणार असल्यामुळे यंदा विक्रमी सभासदत्व होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी, सर्वात कसोटीचा प्रसंग शिवसेनेवर आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाबरोबर युती न केल्यास स्वबळावर लढावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सारी भिस्त शिवसैनिकांवर राहणार आहे. मित्रपक्षाबरोबरच विरोधकांशी दोन हात करावे लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढून राज्यातील दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळविले होते. चालू वर्षीही लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे त्यापार्श्वभूमीवर राबविल्या जात असलेल्या सभासद मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यात या मोहिमेचा लवकरच शुभारंभ केला जाणार असल्याने सुमारे तीन लाखांहून अधिक सभासद अर्ज सेना भवनातून पाठविण्यात आले आहेत. संपर्क प्रमुखांच्या आगामी नाशिक भेटीत या मोहिमेचा शुभारंभ व प्रत्येक तालुका, पदाधिकाºयांना सभासद नोंदविण्याबाबत ‘टार्गेट’ दिले जाणार आहे. या सभासद अर्जाची वैधता दोन वर्षांपर्यंत आहे. ग्रामीण भागात तालुका प्रमुखांना त्याची जबाबदारी तर शहरात प्रत्येक प्रभागनिहाय सभासद नोंदणीसाठी शाखा प्रमुख व प्रभागाच्या नगरसेवक यात महत्त्वाची भूमिका बजावतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार व इच्छुकांकडून सभासद नोंदणीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.चौकट===दोन रुपयात सभासदत्वशिवसेनेचे सभासदत्व नोंदणी शुल्क दोन रुपये असले तरी, सभासदत्व अर्जाचे शुल्क पक्ष पदाधिका-यांकडूनच भरले जाते. पक्ष कार्यालयात अर्जाचे पैसे अदा करून अर्ज दिले जाते. या अर्जात सभासद होऊ इच्छिणाºयाची व्यक्तिगत माहिती नमूद करण्याबरोबरच त्याचा मतदार संघ, मतदान केंद्र क्रमांक, शिक्षण, छंद, व्यवसाय, नोकरी याबाबतही विचारणा करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक