शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची शाकाहारी ढाब्यावर ‘दबंगगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:55 IST

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला.

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला. या ढाब्यावर तत्काळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील पोहचल्याने रात्रीचे भोजन आटोपणाºया ग्राहकांनी त्यांच्याकडे गाºहाणे मांडत पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत ‘दबंगिरी’ करत असल्याचा आरोप ‘त्या’ अधिकाºयासमोरच केला. यावेळी नांगरे-पाटील यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत सहायक आयुक्त वसावे यांना चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून नांगरे-पाटील यांनी मद्यविक्रीवर अंकुश लावण्यासाठी आयुक्तालय हद्दीतील सर्व हॉटेल्स, देशी दारू व्रिकीची दुकाने, परमिटरूम, बार, विदेशी दारू दुकाने रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहे. शनिवारी (दि.२७) आयुक्तालय हद्दीत मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशन रात्री राबविले जात होते. यावेळी इंदिरानगर पोलीस ठाणेप्रमुखांचे पथक परिसरात गस्तीवर असताना, त्यांना येथील एक शाकाहारी ढाबा सुरू असल्याचे लक्षात आले. पोलीस अधिकाºयाने ढाबाचालकास ढाबा तासाभरात बंद करण्याच्या सूचना दिल्या व पथक पुढे रवाना झाले; मात्र तासाभरानंतरही ढाबा सुरूच होता. पोलीस अधिकाºयाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांना बळजबरीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. ग्राहकांमध्ये काही वकील व त्यांचे कुटुंबीयही होते. त्यांनी संबंधित अधिकाºयाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला; मात्र ‘दबंग’ अधिकारी कोणालाही जुमानत नव्हता. अधिकारी मद्याच्या नशेत असल्याचे ग्राहकांना लक्षात येताच त्यांनी त्या दबंग अधिकाºयाच्या वाहनाला घेराव घालत रोखून धरले. दरम्यान, दबंग अधिकाºयाने नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्रावरून माहिती देत ‘लोकेशन’ सांगून मदत मागितली. नियंत्रण कक्षाने त्यांचा संदेश पुढे पाठविला, यावेळी नांगरे-पाटील यांनीही संदेश ऐकला व त्यावेळी योगायोगाने ते इंदिरानगर पोलीस ठाण्यातच असल्याने तत्काळ त्यांनी घटनास्थळ गाठले.खुर्च्यांची उलथापालट; ग्राहकांना धक्काबुक्की‘त्या’ पोलीस अधिकाºयाने सोडलेल्या फर्मानानंतर वाहनातील पोलीस कर्मचाºयांनी ढाब्यामध्ये प्रवेश करून खुर्च्यांची उलथापालट करत ग्राहकांना धक्काबुक्कीदेखील केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वरिष्ठ अधिकाºयाने आपली दहशत पसरविण्याच्या हेतूने ‘दबंगगिरी’ केल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी नांगरे-पाटील यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय