शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

नाशकात प्रथमच सेनेचा भगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

कॉँग्रेस आघाडीला पाठिंबा देणाऱ्या भाजपाची नाचक्की

नाशिक : पालघर पोटनिवडणुकीतील राजकारणाचा बदला म्हणून भाजपाने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री कॉँग्रेस आघाडीला पाठिंबा देऊन शिवसेनेला खिजविले खरे; परंतु शिवसेनेने चारही पक्षांना चारीमुंड्या चित करीत पहिल्यांदाच या मतदारसंघावर भगवा फडकविला. त्यामुळे विशेषत: भाजपाचीच नाचक्की घडून आली.आजवर राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने शिवसेनेचे गतवेळचे पराभूत उमेदवार शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली, तर सेनेने नरेंद्र दराडे या पूर्वाश्रमीच्या कॉँग्रेस पदाधिकाºयाला रिंगणात उतरविले होते. शिवसेनेकडे सर्वाधिक मतदारसंख्या होती, तर दुसºया क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या १६७ मतांच्या भरवशावर परवेज कोकणी यांनी जिल्हा विकास आघाडीच्या वतीने नामांकनदाखल केले. परंतु भाजपाने त्यांनाही वाºयावर सोडून राष्ट्रवादी, कॉँग्रेस व मनसे आघाडीला पाठिंबा दिला. ही ३४३ मते होत असतानाही सहाणे यांना फक्त २३२ मते मिळाली, तर शिवसेनेने स्वत:च्या २०७ मतांच्या बळावर लढत देत इतरांची मिळून तब्बल ३९९ मते मिळविली.अर्थात अखेरच्या क्षणी भाजपाने हात झटकलेले परवेज कोकणी यांनी शिवसेनेला साथ दिल्यानेही विजयाचे पारडे फिरले. या निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ तुरुंगातून सुटल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते; परंतु भुजबळांनी तटस्थता राखल्यानेच आपल्या विजयात भुजबळ यांचा वाटा असल्याची प्रतिक्रिया दराडे यांनी दिली.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक