सातपूर : येथील रोहित हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी विविध उपक्रम राबवून जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून मुलगी वाचवा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी ज्या कुटुंबात एकच मुलगी आहे अशा मातांचा सन्मान करण्यात आला. स्त्रीभ्रूणहत्त्या या विषयावर डॉ. शीतल पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच महिलांचे आजार यावर मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
महिलांचे आरोग्य विषयावर चर्चासत्र
By admin | Updated: March 9, 2015 01:39 IST