शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

भ्रमणध्वनी संचाची हातगाडीवर विक्री

By admin | Updated: November 25, 2015 22:38 IST

मालेगाव : पचास रुपये मे मोबाइल लेलो भाई..!

किशोर इंदोरकर  मालेगाव कॅम्पसध्या सर्वत्र लहान मुलांपासून मोठ्यांपर्र्यंत सर्वांच्या हातात मोबाइल आला आहे. मोबाइलचे खूळ किंवा एका प्रकारचे गरजेपेक्षा व्यसन लागलेले दिसून येते. नवीन नवीन कंपनींचे महागडे मोबाइल दिवसागणिक बाजारात येतात, तर काहीजण जुन्या मोबाइलवर आपली हौस भागवतात. मालेगावी अनेक दुकानांवर जुने मोबाइल तर मिळतातच; परंतु मोबाइलप्रेमींसाठी चक्क ठेला गाडीवर मोबाइलची शहरात काही ठिकाणी विक्री होत आहे. ‘पचास रुपये मे मोबाइल लेलो भाई’ असा आवाज ऐकू येतो. मालेगावची चक्क जुन्या मोबाइलची विक्री ठेला गाडीवर होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आधुनिक युगात मोबाइल वापरणे फार गरजेचे झाले आहे. सर्वांनाच एकाच वेळी अनेकांशी संपर्क ठेवण्यासाठी खिशात मोबाइल ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. नवीन मोबाइल अगदी एक लाखाहून दोन-तीन हजार रुपयांमध्ये दालनात मिळतात. परंतु ज्यांची एवढे पैसे खर्च करण्याची कुवत अथवा इच्छा नसली तर सरळ सरळ जुन्या मोबाइल हॅण्डसेट विकत घेण्यासाठी शोध घेतात.शहरातील जुना भंगार बाजार, सांडवा पूल काही ठिकाणी हे जुने चालू व बंद मोबाइल चक्क पन्नास रुपयांत हातोहात विकले जात आहेत. जुने भ्रमणध्वनी विकत घेतल्यावर किरकोळ दुरुस्ती अथवा नवीन बॅटरी टाकल्यास पुन्हा चालू होतात, असा दावा हे ठेला गाडीवर मोबाइल विक्री करणारे करतात. अगदी पन्नास रुपयात टाटा इंडिकॉम, रिलायन्स, ओनिडा, सॅमसंग, नोकियासह इतर काही नामांकित कंपनीचे जुने मोबाइल हॅण्डसेट (चालू-बंद) विकत घेण्यासाठी गर्दी होत आहे.पन्नास रुपयात मोबाइल घेऊन दुरुस्त झाला तर ठिक नाही तर एफएम अथवा गाणे ऐकण्यासाठी कामी येतो. त्यामुळे पन्नास रुपयात जुना मोबाइल हॅण्डसेट घेण्यात अनेकजण उत्सुक होतात व दिवसभरात या बाजारातून ठेला गाडीवरून मोबाइल हॅण्डसेट विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.