शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वडाळ्यातून थेट मध्यप्रदेशला विक्री; मामीने नवविवाहिता भाचीचा केला सौदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:02 IST

पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. रात्री याच खोलीत संशयित चेत्याने विवाहितेला आपल्या वासनेचा बळी बनविल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.

ठळक मुद्देसंशयित हेमंत व चेत्या ऊर्फ शाहरूख या दोघांनी मिळून बलात्कार केलासंशयित ग्राहक हेमंत धाकड याला दीड लाखात विक्री पोलिसांनी मामीला अटक केली

नाशिक : एका नवविवाहितेची तिच्या मामीने फसवणूक करत अजमेरला दर्ग्यावर दर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून एका राणी ऊर्फ परवीन नावाच्या महिलेशी संगनमताने नवविवाहित युवतीला थेट मध्यप्रदेशमधील दलौदा येथील संशयित आरोपी ग्राहक हेमंत धाकड याला दीड लाखात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित हेमंत व दलाल चेत्या ऊर्फ शाहरूख या दोघांनी मिळून पीडित युवतीला एका खोलीत डांबून मध्यप्रदेशच्या जावरा, बडवन येथे बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडाळागावातील महेबूबनगरमध्ये राहणाऱ्या एका युवतीचा २२ मार्च २०१९ रोजी राजस्थानमधील सिरोई जिल्ह्यातील एका युवकासोबत रीतसर विवाह झाला होता. विवाहानंतर रमजान पर्व सुरू झाले, त्यामुळे नवविवाहितेला आई व भाऊ माहेरी घेऊन आले. वडाळ्यात राहणा-या मामीच्या घरी पीडित नवविवाहिता ६ मे २०१९ रोजी भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या घरात संशयित आरोपी महिला परवीन ऊर्फ राणी, शाहरूख ऊर्फ चेत्या हे बसलेले होते. दरम्यान, अजमेरला दर्ग्यावर दर्शनासाठी जाऊ, असे मामीने पीडितेला सांगून विश्वास संपादन केला. ‘तुझा नवरा अजमेरला आलेला आहे. तू राणी व चेत्यासोबत दर्शनासाठी निघून जा आणि तेथून राजस्थानला नव-यासोबत तुझ्या सासरी जा, माझे तुझे मामा व आईसोबत बोलणे झाले आहे’ असे मामीने पीडितेला खोटे सांगितले. त्यानंतर चेत्या, राणी व जहीर शहा या तिघांनी रिक्षामधून द्वारका येथे पीडितेला नेले. ७ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चेत्या आणि राणी या दोघांनी एका खासगी लक्झरी बसमध्ये पीडितेला बसवून थेट मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील जावरा तालुक्यात उतरविले. तेथे राणीने ‘येथे माझी बहीण राहते, तिला अजमेरला घेऊन जायचे आहे,’ असे सांगितले. त्यानंतर पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. रात्री याच खोलीत संशयित चेत्याने विवाहितेला आपल्या वासनेचा बळी बनविल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पीडितेने पोहोचून संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. संशयित चेत्या ऊर्फ शाहरूख, पीडितेची खरेदी करणारा संशयित हेमंत, परवीन ऊर्फ राणी, पीडितेची मामी या चौघांविरुद्ध अनुक्रमे बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मामीला अटक केली असून उर्वरित फरार संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयHuman Traffickingमानवी तस्करीMadhya Pradeshमध्य प्रदेश