शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा विक्री अन‌् वापर ठरणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:12 IST

नाशिक : द्वारका येथून दुचाकीने प्रवास करणाऱ्या महिलेचा गळा नायलॉन मांजाने चिरला जाऊन तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर शहरातील नायलॉन मांजा, काचेच्या मांजाची विक्री आणि वापर याबाबत प्रशासनाची बोटचेपी भूमिका चव्हाट्यावर आली. यानंतर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले. नायलॉन मांजा विक्री, साठवणूक आणि वापरावर प्रतिबंध घालत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची अधिसूचना पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअधिसूचना जाहीर : पोलीस करणार कठोर कारवाई

नाशिक : द्वारका येथून दुचाकीने प्रवास करणाऱ्या महिलेचा गळा नायलॉन मांजाने चिरला जाऊन तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर शहरातील नायलॉन मांजा, काचेच्या मांजाची विक्री आणि वापर याबाबत प्रशासनाची बोटचेपी भूमिका चव्हाट्यावर आली. यानंतर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले. नायलॉन मांजा विक्री, साठवणूक आणि वापरावर प्रतिबंध घालत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची अधिसूचना पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे.आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीला उधाण येते. संक्रांतीला पंधरवडा शिल्लक असतानाही शहरात आकाशामध्ये मोठ्या संख्येने पतंग उडताना दिसत आहेत. बाजारात नायलॉन मांजा, काचेचा मांंजा याची सर्रासपणे विक्री केला जात असून, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या नायलॉन मांजामुळेच भारती जाधव या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पालकांनीसुद्धा आपल्या मुलांच्या हाती पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा किंवा काचेपासून तयार केलेला मांजा तर नाही ना, याबाबत जागरूक असायला हवे. एक जबाबदार नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजावर बहिष्कार टाकणे गरजेचे असल्याचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले. दरम्यान, शहरात कोठेही चोरी-छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा, काचेच्या मांजाची साठवणूक करून विक्री करताना आढळल्यास अथवा पतंग उडविताना या प्रकारच्या मांजाचा वापर करताना कोणी दिसून आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेतून देण्यात आला आहे.पोलिसांच्या कारवाईकडे आता लक्षअधिसूचना जारी करत पोलिसांनी नायलॉन मांजा वापरावर निर्बंध असल्याचे स्पष्ट केले असले तरी, शहरात चोरट्या मार्गाने विक्री केल्या जाणाऱ्या नायलॉन मांजावर पोलिसांकडून कशाप्रकारे आळा घातला जातो, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. पंचवटी, रविवारकारंजा, जुने नाशिक, वडाळागाव, सिडको, नाशिक रोड, देवळाली गाव आदी भागात नायलॉन मांजा व काचेच्या मांजाचाच बोलबाला असल्याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस