शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांनी जागेवरच व्यवसाय करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:48 IST

राष्ट्रीय फेरीवाला झोनअंतर्गत महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. अन्यथा कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांच्या बैठकीत मनपा प्रशासनाने दिला आहे.

सातपूर : राष्ट्रीय फेरीवाला झोनअंतर्गत महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. अन्यथा कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांच्या बैठकीत मनपा प्रशासनाने दिला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शिवाजीनगर आणि श्रमिकनगर येथील विक्रेत्यांवर महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे मोठे नुकसान होत आहे. या कारवाईला कंटाळून या विक्रेत्यांनी स्थानिक नगरसेवकांकडे धाव घेतली होती. विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी सातपूर विभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, तसेच अनिल भालेराव, दिनकर कंडेकर आदींसह विक्रेते उपस्थित होते. मनपाने दिलेली जागा व्यवसायासाठी उपयुक्त नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, तर दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, काही अडचणी असतील तर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय केला तर मात्र कठोर करवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश विक्रेत्यांना देण्यात आल्याची माहिती विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी दिली आहे.व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदतया बैठकीत मनपा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार बहुतांश विक्रेत्यांनी हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र कार्बननाका परिसरातील जवळपास ५० विक्रेत्यांनी नकार दिल्याने या व्यावसायिकांना प्रशासनाने दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका