पाटोदा : गेल्या तीस वर्षांत प्रथमच पंचवार्षिक निवडणूक बनविरोध पार पडलेल्या व येवला तालुक्यातील ठाणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या सभापतिपदी भाऊसाहेब बाळू शेळके यांची, तर उपसभापतिपदी सुरेश सखाराम घुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत भाऊसाहेब शेळके व राम शेळके असे दोन गट तयार झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. ऐनवेळी संचालक राम शेळके यांच्या गटाने माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. सभापती व उपसभापतीची निवड करण्यातसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एच. एन. कनोज यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत सभापतिपदी भाऊसाहेब बाळू शेळके यांची, तर उपसभापतिपदी सुरेश सखाराम घुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रतन पवार व गौतम घुसळे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
ठाणगाव सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड
By admin | Updated: October 25, 2016 00:13 IST